Wednesday, June 21, 2006

त्रिवेणी

-
दिवस-रात्र तेच चाक फिरवत पळायचं,
त्याच बाहुल्यांचं लग्न पुन्हा-पुन्हा लावायचं,
पण, लहानपणी हे सगळं मनापासून व्हायचं!

-
वाऱ्याचे गरम झोत नि उन्हाचा जाळ,
पावसानंतर चिखल नि पाण्यातला गाळ,
मनंच असं की, आहे त्यात रमत नाही...!

-

आजची मैफ़ील छान झाली

म्हणाले सगळे सह्या घेता

तो 'सा' अजून शोधतोय मी...

:: (१४ जून '०८)

3 Comments:

Anonymous Anonymous said...

प्रणव,

त्रिवेणी हा काव्यप्रकार आपल्याला छानच साधलाय. पुढील लेखनासाठी शुभेच्छा.

June 21, 2006

 
Blogger Pranav said...

Dhanyavaad !

June 21, 2006

 
Anonymous Anonymous said...

प्रणव, पहीली त्रिवेणी अप्रतीम आहे रे!

July 22, 2006

 

Post a Comment

<< Home