Monday, February 13, 2006

शब्दांच्या खेळानंतर...

-
दोस्ता असेल जर, थोडा वेळ तर, बोलू काही
शब्दांच्या या, खेळानंतर, बोलू काही |

उगी भांडणे, तप्त चांदणे, अबोल दुखणे
खुल्या दिलाने, मिटवून अंतर, बोलू काही |

तुझाच भास अन तुझाच ध्यास, अजाण त्रास
गुपीत याचे कळल्यानंतर, बोलू काही |

अनुभवांची, सुखदुःखांची, रंगपंचमी
रंगून होण्या, मस्त कलंदर, बोलू काही |

क्षणात सागर, क्षणात घागर, कधी हे निर्झर
अवखळ मनीचे, विचार सुंदर, बोलू काही |

दुजा सांगणे, स्वतः पहाणे, फ़ुका बहाणे
घेउनी क्रुत्यातून प्रत्यंतर, बोलू काही |

//रदीफ़ जमणे, मतला रचणे, अतीव सुखकर
//गझला करुनी, घ्या प्रत्यंतर, बोलू काही |

-प्रणव

हे कसे वाटते-

जीवन आहे अनुभवांची , रंगपंचमी
रंगून होण्या, मस्त कलंदर, बोलू काही |

3 Comments:

Blogger Mahesh said...

Hi pranav
its amezing to read ur poems
keep writing

June 28, 2006

 
Blogger veerendra said...

सुन्दर लय.. वेगळीच आहे ..

तु सन्दीप खरे ची कविता वाचली आहेस का ? कारण एवढेच की मला ती लेव्हल इथे सापड्ते आहे ,,

October 12, 2006

 
Blogger Unknown said...

http://www.orkut.com/CommMsgs.aspx?cmm=826350&tid=2454355655403328621

February 24, 2008

 

Post a Comment

<< Home